शिष्यवृत्ती रक्कम अधिका-यांनी केली हडप - Marathi News 24taas.com

शिष्यवृत्ती रक्कम अधिका-यांनी केली हडप

www.24taas.com,आरोस
 
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत व्हावी यासाठी देण्यात येणारी शिष्यवृत्तीची रक्कमच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अधिका-यांनी हडप केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. ही रक्कम थोडी थोडकी नाही तर तब्बल २५ लाखांच्या घरात आहे.
 
सिंधुदुर्ग  जिल्ह्यातील चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना 2007 पासून शिष्यवृत्ती मिळालेली नाही. अधिकारी आणि माजी शिक्षणाधिका-यांनी ही शिष्यवृत्ती संगनमतानं लाटल्याची माहिती समोर येतीय.
 
माजी शिक्षणाधिका-यांच्या स्वाक्षरीनेच १२ चेक वटवण्यात आल्याची माहितीही स्पष्ट झालीय. एका शिक्षकानं माहितीच्या अधिकारात ही माहिती उघड केलीय.

First Published: Sunday, July 1, 2012, 11:07


comments powered by Disqus