Last Updated: Monday, December 12, 2011, 08:54
झी २४ तास वेब टीम, खेडरत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये शिवसेनेचे आमदार रामदास कदम यांच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडत पहिल्यांदाच मनसेनं मिळवली सत्ता मिळवली आहे. राज्यात पहिली नगरपालिका ताब्यात घेण्यात मनसेला यश आले आहे. मनसेने ९, शिवसेना ७, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना प्रत्येकी १ जागावर मिळाला विजय मिळविला आहे.
नारायणा’चं तेज ‘भास्करा’मुळे झाकोळलं!दरम्यान, सिंधुदुर्ग या उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडले असून सावंतवाडी नगरपालिकेवर सर्व १७ जागा जिंकत राष्ट्रवादीनं आपला झेंडा फडकवला आहे. काँग्रेसला सावंतवाडीत खातंही खोलता आलेलं नाही. सावंतवाडीच्या या निकालानंतर काही ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी फेरमोजणीची मागणी केली आहे.
नगरपालिका निवडणुकीपूर्वी नारायण राणे आणि भास्कर जाधव यांच्या खडाजंगी झाली होती. या खडाजंगीचा फायदा भास्कर जाधव यांना झाला असून एकूण कोकणात नारायणाचं तेज भास्करामुळे फिकं पडल्याचं चित्र दिसत आहे.
वेंगुर्ल्यातही राष्ट्रवादीनं काँग्रेसकडून सत्ता हिरावून घेतली आहे. वेंगुर्ल्यात राष्ट्रवादीनं सतरा पैकी बारा जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला वेंगुर्ल्यातही एकसुद्धा जागा जिंकता आलेली नाही.
मालवणमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये अटीतटीची लढाई सुरु आहे. रत्नागिरीमध्ये शिवसेना-भाजपने मुसंडी मारली आहे.
कोकणात गेल्या काही दिवसांपासून नारायण राणेंविरुद्ध सर्वपक्षीयांची एकजूट झालेली पहायला मिळाली होती. त्याचेच पडसाद या निवडणुकांच्या निकालांमध्येही पडलेल्या दिसताहेत.
First Published: Monday, December 12, 2011, 08:54