Last Updated: Tuesday, December 13, 2011, 08:06
झी २४ तास वेब टीम, नवी मुंबई 
नवी मुंबईतल्या तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये व्हीव्हीएस या साबण बनवण्याच्या कंपनीला रात्री साडेबाराच्या सुमारास आग लागली. आग आटोक्यात आणली असली तरी आगीमुळं कंपनीचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.
केमीकल पावडरलाही आग लागल्यानं आगीनं भयंकर स्वरुप धारण केलं होतं. अग्निशमन दलाच्या १० गाड्यांनी घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणली. पहाटे चारच्या सुमारास ही आग नियंत्रणात आली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. आगीमुळं कोणतीही जीवीतहानी झाली नसली तरी लाखो रुपयांचे नुकसान झालं आहे.
First Published: Tuesday, December 13, 2011, 08:06