नवी मुंबईत 'स्वाईन फ्लू'चा पहिला बळी - Marathi News 24taas.com

नवी मुंबईत 'स्वाईन फ्लू'चा पहिला बळी

www.24taas.com, नवी मुंबई
 
‘स्वाईन फ्लू’नं अर्थात H1N1 नं  मुंबईत पुन्हा एकदा धडक दिलीय. नवी मुंबईत स्वाईन फ्लूचा पहिला बळी गेल्याचं सिद्ध झालंय.
 
बेलापूरची सरिता चव्हाण ही 13 वर्षांची मुलगी स्वाईन फ्लूमुळे मृत्युमुखी पडलीय. अत्यंत गंभीर अवस्थेत तिला जवळच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारांदरम्यान 3 जुलैला तिचा मृत्यू झाला होता. आज आलेल्या वैद्यकीय अहवालातून तिला ‘स्वाईन फ्लू’ची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय.

First Published: Thursday, July 5, 2012, 15:45


comments powered by Disqus