'जिद्दी' रविंद्रला हवाय मदतीचा हात - Marathi News 24taas.com

'जिद्दी' रविंद्रला हवाय मदतीचा हात

www.24taas.com, सिंधुदुर्ग 
 
ही कहाणी आहे सिंधुदुर्गातल्या एका जिद्दीची... गरिबीचे चटके सोसत उत्तुंग यश मिळवणाऱ्या एका विद्यार्थ्याची...
 
घरात अठरा विश्व दारिद्रय... दोन वेळच्या खाण्याची भ्रांत... विजेचा पत्ता नाही... तरिही सिंधुदुर्गातल्या सरमळे गावातला रवींद्र कांबळे खचला नाही... कुटुंबासाठी कामं केली... प्रसंगी शाळेत अनवाणी गेला... मात्र, दहावीत त्यानं उत्तुंग यश मिळवलंय... घरच्या गरीब परिस्थितीवर मात करत त्यानं दहावीत 91 टक्के मिळवलेत आणि सावंतवाडी विभागात पहिला येण्याचा मान त्यानं पटकावलाय...
 
देदीप्यमान यश मिळवले तरिही रवींद्रसमोरचे प्रश्न संपलेले नाही तर आत्ता कुठे त्यांची सुरुवात झालीय, असंच म्हणावं लागतंय. कारण, उच्च शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या रवींद्रला इंजिनिअर व्हायचंय. मोठ्या मुलाला 89 टक्के मिळूनही पैशाअभावी शिक्षण घेता आलं नाही मात्र आता रवींद्रलाही शिक्षणाचं स्वप्न अपूर्ण ठेवावं लागणार की काय? ही चिंता रवींद्रची आई जयश्री कांबळे यांना सतावतेय आणि म्हणूनच सिंधुदुर्गातल्या या गुणवंताला हवाय एक मदतीचा हात. ‘झी 24 तास’ याचसाठी करतंय एक आवाहन... कदाचित, तुमच्या मदतीमुळे एका संपूर्ण कुटुंबाचं जीवन मार्गी लागू शकतं.

First Published: Friday, July 6, 2012, 13:42


comments powered by Disqus