Last Updated: Friday, July 6, 2012, 13:12
www.24taas.com, उरण उरणजवळच्या चिरनेरमधील खारपाटील गोडाऊनमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागनं गुरुवारी धाड टाकली. यामध्ये बेकायदेशीरपणे साठवणूक केलेला सुमारे 124 कोटी 35 लाख रुपयांचा कडधान्याचा साठा जप्त करण्यात आलाय.
या गोडाउनमध्ये वटाणा, तुरडाळ , मसूरदाल, ज्वारीचा २२ हजार टन साठा जप्त केला गेलाय. या प्रकरणात उरण पोलीसांनी गोडाऊनचालक पियुष अग्रवाल आणि पाच खाजगी कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय. धान्यसाठा करणाऱ्या या कंपनीकडे धान्य साठविण्याचा परवाना नसल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. राज्यातली अलीकडच्या काळातली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगण्यात येतंय.
First Published: Friday, July 6, 2012, 13:12