Last Updated: Sunday, July 8, 2012, 13:40
www.24taas.com, पनवेल पनवेल इथल्या अजवली गावात असलेल्या सोहनलाल कम्युनिटी मॅनेजर या कंपनीच्या गोडाऊन मध्ये राज्य दक्षता पथक आणि जिल्हा अधिकारी, तहसीलदार यांनी शनिवारी धाड टाकून १७ हजार क्विंटल तुरडाळ आणि मुगडाळ साठा जप्त केला.
अनधिकृतरीत्या साठा करुन ठेवण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. बाजारभावानुसार या डाळीची किंमत नऊ कोटी आहे. या प्रकरणी पनवेल पोलिसांनी सोहनलाल कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे.
ही कंपनी दिल्ली येथील असून त्यांनी साठवणूक केलेल्या धान्य-मालाची कागदपत्र नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे .
First Published: Sunday, July 8, 2012, 13:40