Last Updated: Thursday, October 6, 2011, 09:44
झी 24 तास वेब टीम, भाईंदर भाईंदर येथील सिद्धीविनायक या २१ मजली टॉवरचे रंगकाम सुरू असताना परांची कोसळल्याने आठ मजूर खाली पडले. या अपघातात तीन मजूरांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना मीरारोड येथील उमराव हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
सिद्धीविनायक टॉवरचे रंगकाम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होते. आज काम सुरू असताना आठव्या मजल्यावरील परांचीचा एक भाग अचानक कोसळला. त्यामुळे रंगकाम करताना आठ मजूर जमिनीवर आदळले. या अपघातात तीन मजूर जागीच ठार झाले. तर इतर पाच जखमींना त्वरीत मीरारोड येथील उमराव हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू केला असून या प्रकरणात दोषी कोण ते लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.
First Published: Thursday, October 6, 2011, 09:44