Last Updated: Wednesday, December 14, 2011, 08:16
झी २४ तास वेब टींम, अंबरनाथ 
अंबरनाथचे शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर हल्लाप्रकरणाला शिवसेना नगरसेवक पंढरीनाथ वारिंगे आणि त्याचा नातेवाईक योगेश ठाकरेला अटक करण्यात आली. या दोघांनाही ७ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.
अंबरनाथचे शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर हल्ला प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली. उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागानं याप्रकरणी शिवसेनेचाच नगरसेवक पंढरीनाथ वारिंग आणि त्याचा नातेवाईक योगेश ठाकरेला अटक केली. या दोघांनाही ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. वाळेकर यांच्यावर २३ नोव्हेंबरच्या रात्री ५ ते ६ हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. त्यात वाळेकरांचा अंगरक्षक आणि एक मारेकरी ठार झाला होता.
पंढरीनाथ वारिंगे हा वार्ड क्रमांक ५० चा नगरसेवक आहे. त्याच्यावर १० ते १५ गुन्ह्यांची नोंद आहे. सहा महिन्यांपूर्वी पंढरीनाथ वारिंगेचा भाऊ शिवसेना नगरसेवक नितीन वारिंगेची हत्या झाली होती. नितीनच्या हत्येआधी वारिंगचा भाचा समीर गोसावीचीही हत्या झाली होती. या दोन्ही हत्यांशी वाळेकर यांचा संबंध असल्याच्या संशयावरून हा गोळीबार झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
First Published: Wednesday, December 14, 2011, 08:16