गणेश मंडळांवर जबाबदारी, नाहीतर गुन्हा फौजदारी! - Marathi News 24taas.com

गणेश मंडळांवर जबाबदारी, नाहीतर गुन्हा फौजदारी!

कपिल राऊत, www.24taas.com, ठाणे
 
ठाण्यात गणेश मंडळांना रस्ते खोदण्याच्या मुद्द्यावरुन महापालिका आयुक्तांनी इशारा दिला होता. नवे रस्ते खोदले तर फौजदारी गुन्हे दाखल कऱण्याचा इशारा देण्यात आला होता. गणेश मंडळांच्या मागे जे उभे राहतील त्यांनी या रस्त्यांची जबाबदारी घ्यावी असं आयुक्तांनी जाहीर केलंय.
 
ठाण्यात 130 किलोमीटरचे आधुनिक रस्ते बनवण्यात आलेत. शहरात जवळपास 500 मंडळे आहेत. हे रस्ते वाचवायचे असतील तर मंडळांनी गणेशोत्सवात मंडप बांधताना रस्ते खोदू नयेत अशी ताकीद दिली आहे. अन्यथा फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिलाय. आयुक्तांच्या इशा-यानंतर शिवसेनेनं गणेश मंडळांवर फौजदारी गुन्हे दाखल होऊ देणार नाही अशी भूमिका घेतलीय.
 
रस्ते वाचवण्यासाठी हे पाऊल उचललं असून लोकांना त्याचा फायदा होणार असल्याचं आयुक्तांनी सांगितलंय. आयुक्तांच्या भूमिकेचं सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वागत केलंय. या मुद्द्यावर संघर्षाची भूमिका घेण्यापेक्षा रस्ते वाचले पाहिजेत आणि उत्सवही आनंदात साजरा झाला पाहिजे असा मध्यममार्ग काढल्यास सर्वांचाच फायदा आहे.

First Published: Thursday, July 12, 2012, 08:09


comments powered by Disqus