मनसेच्या पदाधिकाऱ्यांना महिला शिक्षिकांची मारहाण - Marathi News 24taas.com

मनसेच्या पदाधिकाऱ्यांना महिला शिक्षिकांची मारहाण


झी २४ तास वेब टीम, नवी मुंबई
 
नवी मुंबईत मनसेच्या कार्यंकर्त्यांनी दयानंद अंग्लोवैदीक महाविद्यालयात तोडफोड केली आहे. यावेळी मनसैनिकांनी मुख्याध्यापकांच्या तोंडाला काळेही फासले. शाळेतील शिक्षक आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये यावेळी जोरदार धक्काबुक्की झाली.
 
नवी मुंबईतील मनसेच्या विद्यार्थी सेनेने स्कूल बसबाबत प्रत्येक शाळेने समिती गठीत करावी असे निवेदन दिले होते. या शाळेने याबाबत अंजलबजावणी का केली नाही याची विचारणा करण्यासाठी सीवूडच्या या शाळेत मनसैनिकांनी धडक दिली. यावेळी मुख्याध्यापकांसोबत बोलताना मनसेच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली. यावेळी मनसैनिकांनी मुख्याध्यापक जोफ यांच्या तोंडाला काळं फासलं.
 
या धक्काबुक्कीत शाळेतील महिला शिक्षकांनीही उडी घेत मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. याप्रकरणी पोलिसांनी मनसेच्या ७ कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

First Published: Wednesday, December 14, 2011, 12:45


comments powered by Disqus