प्रश्न घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीचा - Marathi News 24taas.com

प्रश्न घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीचा


झी २४ तास वेब टीम, ठाणे
 
ठाण्याच्या घोडबंदर रोडवर संथ गतीने सुरु असलेल्या पुलाच्या कामामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतंय. या कामावर कुणाचाही अंकुश नाही असा आरोप प्रवासी करतायत तर सत्ताधारी केवळ पोकळ आश्वासन देतायत.
 
ठाण्यामधला घोडबंदर रोड हा ठाणेकरांसाठीच नाही तर ठाणे बोरिवली प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठीही महत्त्वाचा आहे. मात्र या रोडवर एमएसआरडीच्या चार पुलांचं काम संथ गतीने सुरु असल्याने प्रवाश्यांना त्रासाला सामोरं जावं लागतंय. १८ महिन्यात पूर्ण करायचं हे काम गेली तीन वर्ष सुरु आहे. या रखडलेल्या कामामुळे २० मिनीटांच्या अंतराला एक ते दीड तास लागतोय. त्यामुळे हे काम लवकरात लवकर संपवून या वाहतूक कोंडीवर तोडगा काढावा अशी मागणी प्रवासी करतायत.
 
महापौरांना याबाबत विचारलं असता MSRDCचे अधिकारी संथ गतीने काम करतायत तरी आम्ही हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याकडे लक्ष देत आहोत असं त्यांनी सांगितलंय.  महापालिका आणि MSRDC च्या वादात प्रवासी मात्र भरडले जातायत.

First Published: Thursday, December 15, 2011, 10:55


comments powered by Disqus