प्रगती एक्स्प्रेस कायमस्वरूपी पनवेलमार्गे - Marathi News 24taas.com

प्रगती एक्स्प्रेस कायमस्वरूपी पनवेलमार्गे

www.24taas.com, पनवेल
 
पुण्याला आता कमी पैसात जाता येणे शक्य होणार आहे. एसटीच्या भाड्याच्या निम्म्या दरात पुण्याला पोहोचता येणार आहे. कारण आता पनवेलमार्गे प्रगती एक्स्प्रेस सुरू करण्यात आली आहे.
 
प्रायोगिक तत्त्वावर मुंबई विभागाची प्रगती एक्स्प्रेस आता कायमस्वरूपी कर्जत-पनवेल-दिवा मार्गे चालविण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला असल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए.के. सिंग यांनी  दिली. पनवेलमार्गेही मिळणार्‍या उत्तम प्रतिसादाचा कौल बघून रेल्वे बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. अप-डाऊन दोन्ही मार्गे ही गाडी याच मार्गे चालविण्यात येणार आहे.
 
प्रगती एक्स्प्रेस  ही गाडी या मार्गे धावल्याने कर्जतकरांनाही याचा लाभ मिळावा अशी मागणी होत आहे.  गाडीला तांत्रिकदृष्ट्या कर्जतमध्येही थांबा मिळावा, या मागणीचाही विचार रेल्वे प्रशासनाने करावा, अशी मागणी  रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे. ही गाडी सध्या केवळ डाऊन मार्गे पुण्याला जाताना कर्जतला थांबते. ती अपमार्गेही थांबावी, ही कर्जतवासीयांची मागणी आहे.

First Published: Tuesday, July 31, 2012, 13:32


comments powered by Disqus