यंदा ठाणे मॅरेथॉनला वादाचा 'अडथळा' - Marathi News 24taas.com

यंदा ठाणे मॅरेथॉनला वादाचा 'अडथळा'

www.24taas.com, ठाणे
 
ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन वादाच्या भोव-यात सापडण्याची चिन्ह आहेत. मनपाच्या वतीनं दरवर्षी मॅरथॉन स्पर्धेकरिता खर्च करण्यात येतो. मात्र हा खर्च नागरी उपयोगी कामासाठी करण्यात यावा असं काँग्रेसच्या एका नगरसेवकानं म्हटलंय. तर या स्पर्धेकरिता मनपा अनुदान देत असली तरी प्रायोजकांमार्फत स्पर्धा घेण्यात येत असल्याचं महापौरांनी म्हटलंय.
 
ठाणे महानगर पालिकेच्या वतीनं यंदा 26 ऑगस्टला महापौर वर्षा मॅरथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. स्पर्धेचं यंदाचं हे 23 वं वर्ष असून स्पर्धेत अंदाजे 50 हजार खेळाडू सहभागी होणार आहेत. यंदा पावसानं ओढ दिल्यामुळे टँकरच्या पाण्याचा स्पर्धेत वापर करू नये तसंच होणारा खर्च गरीब आणि गरजू विध्यार्थ्यांकरिता करावा तसंच नागरी सुविधा देण्यात याव्यात असं पत्र काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवारांनी मनपा आयुक्त आर.ए. राजीव आणि महपौर हरिश्चंद्र पाटील यांना दिलंय. तर या स्पर्धेसाठी मनपाच्या वतीनं 35 लाखांची तरतूद करण्यात आलीए. मात्र खेळाडू वृत्तीनं  मनपाकडून अनुदान न घेता प्रायोजकांमार्फत स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्याचं महापौरांनी सांगितलंय.
 
ठाण्यात स्पर्धेसाठी जो मार्ग असतो त्या मार्गावरील खड्ड्यांकडे  मनपानं लक्ष दिलं तरीदेखील स्पर्धा यशस्वी होईल. तसंच भविष्यात नगरसेवकाच्या या सूचनेचा अंमल केला तर नक्कीच गरजू विध्यार्थ्यांना मदत तसंच ठाणेकरांना नागरी सुविधा मिळू शकतील.
 

First Published: Wednesday, August 1, 2012, 14:14


comments powered by Disqus