Last Updated: Wednesday, August 1, 2012, 15:19
www.24taas.com, रायगड किल्ला 
रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटविला. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हा पुतळा ह़टवलाय. या प्रकऱणी संभाजी ब्रिगेडच्या सात कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आला आहे.
त्यामुळं वाद पेटण्याची शक्यता आहे. इतिहासात असं काहीही घडलेलं नाही, त्यामुळे चुकीच्या पद्धतीनं लिहलेला इतिहास खपवून घेतला जाणार नाही अशी भूमिका संभाजी ब्रिगेडनं घेतली आहे. या आधीही संभाजी ब्रिगेडच्या आक्रमक भूमिकेमुळं पुणे महापालिकेनं दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवला होता.
वर्षभरापूर्वी हा पुतळा हलवण्यासाठी संभाजी ब्रिगेडकडून सरकारला मुदत देण्यात आली होती. दरम्यानच्या काळात राज्यभरात अनेक ठिकाणी ब्रिगेडकडून आंदोलनंही करण्यात आली होती.
First Published: Wednesday, August 1, 2012, 15:19