ठाणे काँग्रेसला सुप्रीम कोर्टाची चपराक - Marathi News 24taas.com

ठाणे काँग्रेसला सुप्रीम कोर्टाची चपराक


www.24taas.com, ठाणे
 
ठाण्यातील काँग्रेसला सुप्रीम कोर्टानं पुन्हा एकदा चपराक दिलीय. सुप्रीम कोर्टानं विरोधी पक्षनेता काँग्रेसचा नाही तर दुस-या क्रमांकाचा पक्ष असलेला राष्ट्रवादीचा असावा असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेता राष्ट्रवादीचा होणार यावर आता शिक्कामोर्तब झालंय.
 
महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारास डावलून विरोधीपक्षनेतेपदी काँग्रेसच्या मनोज शिंदे यांची नियुक्ती केली होती. मात्र उच्च न्यायालयानं ही नियुक्ती बेकायदा ठरवल्यानं शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. मात्र तिथेही शिंदे यांना चपराक बसलीय शिवाय महापौरांची निर्णयप्रक्रिया पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडली आहे.
 
ठाणे महापालिकेतील सत्तेचं गणित आपल्या बाजूनं वळविण्यासाठी शिवसेना नेत्यांनी महापौर पाटील यांच्या माध्यमातून घेतलेले महत्वाचे निर्णय गेल्या काही महिन्यांपासून अडचणीचे ठरतायेत. त्यामुळे महापौरांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीनं केलीय.

First Published: Saturday, August 4, 2012, 11:53


comments powered by Disqus