बाप्पा पावला, कोकणासाठी जादा रेल्वे - Marathi News 24taas.com

बाप्पा पावला, कोकणासाठी जादा रेल्वे

www.24taas.com, मुंबई
 
कोकणात मोठ्या उत्सहात  गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यासाठी चाकरमानी गावाचा रस्ता धरतात. मात्र, यावेळी दोन महिने आधीच रेल्वेचे आरक्षण फुल झाले होते. त्यामुळे गावाला जायचे कसे, असा प्रश्न गणेश भक्तांना पडला होता. मात्र, हा प्रश्न निकालात निघाला आहे.  कोकणात जाणा - या भाविकांच्यासुविधेसाठी मध्य रेल्वेने सीएसटी ते मडगाव मार्गासाठीदररोज ३८ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे .
 
 विशेष  पन्नास गाड्या 
कुर्ला टर्मिनस ते मडगावसाठी दर दिवसाआड अनारक्षित विशेष २२ स्पेशल गाड्या सोडण्यात येणार आहेत. या पन्नास गाड्या गाड्या केवळ कोकणवासीयांच्या सुविधेसाठी असतील . त्यापैकी सीएसटी ते मडगाव १५ ते सप्टेंबर ते १९ ऑक्टोबर आणि अनारक्षित गाड्या १४ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध असतील .
 
 मुंबई सीएसटी 
मुंबई - मडगाव दरम्यान धावणाऱ्या सीएसटी - मडगाव - सीएसटी विशेष गाडी १४ सप्टेंबरपासून मध्यरात्री १२. २० वाजता सुटणार असून ती मडगावमध्ये दुपारी २ . १० वाजता पोहोचेल . १५ सप्टेंबरपासून मडगावहून परतणारी ही गाडी दुपारी २ . ४० वाजता  सुटेल. ही गाडी सीएसटीला पहाटे ५ . १५ वाजता पोहोचणार आहे. या गाडीस एक एसी - टू टायर , दोन एसी - थ्री टायर , १० स्लीपर कोच , तीन जनरल सेकंड क्लास , दोनजनरल सेकंड अशी डब्यांची स्थिती आहे .
 
 लोकमान्य टिळक टर्मिनस
लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी)  - मडगाव - एलटीटी ही दर दिवसाआड धावणारी अनारक्षित विशेष गाड्या १३ सप्टेंबरमध्यरात्री १२ . ५० वाजता सुटून मडगावला दुपारी ३ . ३० वाजता पोहोचेल . मडगावहून ही गाडी दुपारी चारवाजता सुटून एलटीटीला सकाळी ८ . १० वाजता पोहोचेल . या दोन्ही गाड्यांचे बुकिंग सुरू आहे.
 
गाड्यांना थांबा कोठे आहे?
दादर , ठाणे , पनवेल , रोहा , माणगाव , वीर , खेड , चिपळूण , सावर्डे , आरवली , संगमेश्वर , रत्नागिरी ,आडवली , विलवडे , राजापूर , वैभववाडी , नांदगाव , कणकवली , सिंधुदुर्ग , कुडाळ , सावंतवाडी , मडुरे ,पेरनेम , थिवीम आणि करमाळी

First Published: Thursday, August 9, 2012, 20:51


comments powered by Disqus