Last Updated: Friday, December 23, 2011, 08:16
झी २४ तास वेब टीम, सिंधुदुर्ग नगर परिषद निवडणुकीत कोकणात राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली. तरी काही ठिकाणी राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रतिष्ठेची केलेल्या मालवण नगरपरिषदेवर उद्योग मंत्री नारायण राणे यांचे वर्चस्व दिसून येणार आहे. मालवणमध्ये काँग्रेसचाच नगराध्यक्ष होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नारायण राणे यांच्या मालवण मतदार संघात नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीनं शिवसेनेच्या साथीनं यश मिळवलं. मात्र संख्याबळ असूनही राष्ट्रवादीसमोर विरोधात बसण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. अपक्ष नगरसेवक महेश जावकर यांनी प्राधिकृत प्रतिनिधी मार्फत अर्ज भरला नाही असं काऱण दाखवतं कोकण आयुक्त एस.एस. संधू यांनी जावकर यांचा अर्ज बाद ठरवला.
नारायण राणे यांच्याविरोधात सर्वच विरोधक निवडणुकीत उतरले होते. तसेत राज्यमंत्री भास्कर जाधव आणि राणे वाद पेटला होता. त्यामुळे कोकणात निवडणुकीचे रणसंग्राम पेटले होते. राणेंना शह देण्यासाठी प्रयत्न झाले होते. परंतु संख्याबळावर राणेंनी बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसचे संख्याबळ ८ तर राष्ट्रवादी ६, शिवसेनेचे २ आणि १ अपक्ष असं विरोधातलं संख्याबळ आहे. त्यामुळं आता काँग्रेसचे सुरेश आचरेकर नगराध्यक्ष होण्याची शक्यता आहे.
First Published: Friday, December 23, 2011, 08:16