खूनी खंडणीखोर गजाआड - Marathi News 24taas.com

खूनी खंडणीखोर गजाआड

झी २४ तास वेब टीम, रायगड
 
खोपोलीतले उद्योजक आशिष वेदप्रकाश बन्सल यांचं खंडणीसाठी अपहरण केल्यानंतर ४१ लाखांची खंडणी उकळूनही त्यांचा निर्घृण खून करणारे चार आरोपी नवी मुंबई पोलिसांनी गडाआड केलेत.
 
बन्सल यांचं अपहरण करून त्यांच्या कुटुंबीयांकडे ४१ लाखांची मागणी केली होती. ४१ लाख रुपये खंडणी वाशी रेल्वे स्टेशनसमोर देण्यास सांगण्यात आली. खंडणीची रक्कम पोचती झाल्यानंतर उद्योजक बन्सल यांना सोडण्याऐवजी त्यांच्यावर गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आला आणि त्यांचा मृतदेह कोलखा गाव इथं फेकण्यात आला.
 
या प्रकरणी क्राईम ब्रँचनं चार आरोपींना सापळा रचून पकडलं.  शुक्रवारी रात्री सीबीडीतल्या 'मेहरा' हॉटेलजवळ पोलिसांनी मारेकऱ्यांना जेरबंद केलं आणि मोईद्दीन खान, नसरत अली मोहम्मद इद्रीस खान उर्फ जाबिर अली, आसिफ नासिर हुसेन आणि रिझवान इब्राहिम वाडिया अशी या चौघांची नावं आहेत. खंडणीखोरांच्या क्रूर कृत्यामुळे नवी मुंबईत उद्योजक हादरले होते.
 
 

First Published: Saturday, December 24, 2011, 21:34


comments powered by Disqus