Last Updated: Saturday, December 24, 2011, 23:21
झी २४ तास वेब टीम, वसई मुंबईजवळच्या वसईत सध्या ख्रिसमस कार्निवलची धूम आहे. पारंपारिक पद्धतीनं आयोजित केलेल्या कार्निवलमध्ये अबालवृद्ध सहभागी झाले होते. शहारातल्या गावातल्या प्रत्येक गल्लीतून शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या.
यामध्ये ख्रिस्ती बांधव वेगवेगळ्या वेषभूषा करुन पारंपारिक वाद्याच्या तालावर नाचत होते. आनंदी वातावरण निर्माण करणारा कार्निवल लक्षवेधी ठरतोय. येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळी राजांचा राजा कोण हे पाहण्यासाठी त्यावेळेचे सत्ताधिश उंटावरुन निघाले होते. हा देखावा माणिकपूरमध्ये साकारण्यात आला होता. दुःखी माणसाच्या दुःखावर पांघरुण घालणे हा कार्निवलच्या आयोजनामागचा उद्देश आहे. यंदा वसई कार्निवलमध्ये स्त्री भ्रूण हत्यांसंदर्भात जनजागृती करणारा संदेश देण्यात आला होता.
तर दुसरीकडं येशू जन्माचा देखावा म्हणजेच आकर्षक गोठे बनवण्य़ात आलेत. आज रात्रीपासून हे गोठे सर्वसामान्यांना पहायला मिळणार आहेत. वसईत गोठे बनवण्याच्या स्पर्धेचं आयोजनही करण्यात आलंय. येशू ख्रिस्ताच्या जन्माची कहाणी लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी हे गोठे बनवण्यात येतात. गोठ्यांच्या देखाव्याच्या माध्यमातून काही ठिकाणी सामाजिक संदेशही देण्याचा प्रयत्न करण्यात येतोय.
First Published: Saturday, December 24, 2011, 23:21