नवी मुंबईत 'चौपाटी महोत्सव' - Marathi News 24taas.com

नवी मुंबईत 'चौपाटी महोत्सव'

झी २४ तास वेब टीम, नवी मुंबई
 
नवी मुंबई 'पर्यावरण संरक्षण चॅरिटेबल ट्रस्ट'च्या वतीनं नवी मुंबईत चौपाटी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. महोत्सवात सांस्कृतिक महोत्सवासह खाद्यपदार्थांची रेलचेल आहे.
 
महोत्सवाचं उद्घाटन मराठी अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि अभिनेत्री अमृता सुभाष यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी गंगा पूजा करून दिवे पाण्यात सोडण्यात आले. महोत्सवाचं यंदाचं हे चौथं वर्ष आहे. पाण्यावर तरंगता मंच या महोत्सवाचं वैशिष्ट्य ठरलंय.
 
यावेळी नवी मुंबई पर्यावरण संरक्षण चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी एक लाखांचा धनादेश देण्यात आला. तर वृद्धांना ओळख कार्डचं वाटप करण्यात आलं. चौपाटी परिसरात हिरवळ निर्माण व्हावी यासाठी पर्यावरण संरक्षण चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सात हजार झाडं या परिसरात लावण्यात आली आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या चौपाटी महोत्सवात तरंगत्या मंचावर सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून सागरी खाद्यपदार्थांचीही महोत्सवात रेलचेल असणार आहे.

First Published: Monday, December 26, 2011, 08:02


comments powered by Disqus