लोकल ट्रेनची मस्करी बेतली जीवावर - Marathi News 24taas.com

लोकल ट्रेनची मस्करी बेतली जीवावर

झी 24 तास वेब टीम, बदलापूर
 

लोकल ट्रेनमधून नेहमीच केली जाणारी मस्करी ही जीवावर बेतू शकते, असचं आज घडलं आहे. बदलापूर-वागंणी दरम्यान ही अशीच एक घटना घडली आहे.
 
बाजूने जाणा-या लोकलमधील काही मुलांनी त्यांना कानाखाली मारल्या. त्यावेळी लोकलमधून तोल गेल्याने हे चौघेजण लोकलमधून खाली पडले. प्रशांत गायकर, प्रशांत दळवी आणि नागमन बोडकर आणि दिनेश अशी लोकलमधून पडून जखमी झालेल्या मुलांची नावं आहेत. या चौघांनाही सायन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

First Published: Saturday, October 8, 2011, 16:05


comments powered by Disqus