युवकाची हौस भारी, ट्रेन रखडली खरी - Marathi News 24taas.com

युवकाची हौस भारी, ट्रेन रखडली खरी

झी २४ तास वेब टीम, कल्याण
 
लोकल ट्रेनच्या टपावर बसुन लोकलचा प्रवास करणं धोक्याचं असतं हे वारंवार सांगुनही अनेकजण जीव धोक्यात घालतात. विठ्ठलवाडी इथला धीरज विठ्ठल गरज हा २५ वर्षाचा युवक टपावरून प्रवास करताना पेंटाग्राफमध्ये अडकल्यानं भाजला. अंबरनाथ ते बदलापूर दरम्यान ही घटना घडली. धीरजला उल्हासगरच्या मध्यवर्ती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल आहे.
 
हा युवक पेंटाग्राफमध्ये अडकल्याने त्याला काढण्यासाठी काही काळ रेल्वे सेवा थांबविण्यात आली होती. यामुळे कल्याणमध्ये अनेक लोकल झाल्या रद्द  करण्यात आल्या. अंबरनाथ - कर्जत लोकल ट्रेन ठप्प झाल्या होत्या.  लोकलसेवा मात्र  खूप वेळ विस्कळीत झाल्याने  चाकरमान्यांचे ऐन गर्दीच्या वेळी हाल झाले.

First Published: Thursday, December 29, 2011, 00:07


comments powered by Disqus