Last Updated: Friday, December 30, 2011, 09:43
झी २४ तास वेब टीम, पणजी गोव्यातल्या जगप्रसिद्ध सनबर्न पार्टीला कांदोळी बीचवर सुरुवात झालीय. आशियातल्या या सर्वात मोठ्या समजल्या जाणा-या सनबर्न पार्टीला, तरुणाईची झुंबड उडालीय.
डीजेच्या तालावर धुंद थिरकणारी पावलं..जल्लोषी संगीत आणि मदमस्त माहौल... असा आगळावेगळा फिल देणा-या आशियातल्या सर्वात मोठ्या सनबर्न पार्टीला गोव्याच्या कांदोळी किना-यावर सुरुवात झालीय. या पार्टीत थिरकण्यासाठी तरुणाईची एकच झुंबड उडालीय.
रॉक क्लायम्बिंग, बीच व्हॉलीबॉल, व्हीआयपी लॉऊंज, ड्रेस-अप लॉऊंड आणि सनसेट लॉऊंज अशा वेगवेगळ्या विभागात विभागली गेलेली ही पार्टी, ११० डीजेंना एकत्र आणते. त्यात भर पडत आहे ती तरूणाईची. त्यामुळं इथे तरूणाई वेगळीच झिंग पाहायला मिळत आहे.
जगभरातल्या चित्रपट, स्पोर्ट आणि इतर सेलिब्रिटीजची उपस्थिती हे या पार्टीचं प्रमुख आकर्षण ठरतंय. संगीताच्या मेजवानी बरोबरच किनारी पर्यटन, नृत्य आणि पार्टीचा मनसोक्त आनंद सनबर्नमुळे पर्यटकांना अनुभवायला मिळतोय.
First Published: Friday, December 30, 2011, 09:43