डोंबिवलीत नागरिकाला पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप - Marathi News 24taas.com

डोंबिवलीत नागरिकाला पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप

झी २४ तास वेब टीम, डोंबिवली

डोंबिवलीतल्या विष्णूनगर पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप मोठा गावातील सोमनाथ म्हात्रे यांनी केला  आहे.सोमनाथ म्हात्रे विष्णुनगर पोलीस ठाण्याजवळच्या मच्छीबाजारात मच्छी आणण्यासाठी गेले होते. यावेळी तिथं  आलेल्या पोलीस शिपायानं त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून नेलं. तिथं पोलीस निरीक्षक कुलकर्णी आणि पोलीस  कॉन्स्टेबल्सनी मारहाण केल्याचं सोमनाथ सांगत आहेत.मारहाणीबाबत विचारणा करणा-या सोमनाथ यांच्या  भावालाही पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरं दिली.म्हात्रे यांनी या प्रकरणी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांकडं तक्रार केली  आहे. त्यासोबत वैद्यकीय तपासणीचा अहवालही जोडण्यात आला आहे.
 
 
 
 

First Published: Saturday, December 31, 2011, 20:57


comments powered by Disqus