कोल्हापुरातून झुकूझुक आगीनगाडी कोकणात - Marathi News 24taas.com

कोल्हापुरातून झुकूझुक आगीनगाडी कोकणात


www.24taas.com, कोल्हापूर/रत्नागिरी

 
झुकूझुक आगीनगाडी, नव्या रुटवरुनही आता वाट काढी. ही वाट काढण्याची चिन्हे दिसत आहेत. वारणानगर अथवा राधानगरीमार्गे राजापूर, अशी नव्याने कोकण रेल्वे धाऊ लागेल. त्यासाठी चाचपणी सुरू होऊन निविदा काढण्याची प्रक्रीया सुरू झालीय.
 
खडतर अशा डोंगराना कापत, माडा पोफळ्याच्या रांगातून रेल्वे कोकणाच्या लाल तांबड्या मातीतून कोकण रेल्वे धावायाला सुरुवात झाली आणि कुठलाही मार्ग आता जड नाही हे सिद्ध झालं. त्यामुळ कोल्हापूर-कोकण रेल्वे मार्ग होईल यात शंका नाही.
 
प्रवाशांच्या सोयीसाठी आता काही नव्या मार्गाचेही सर्वेक्षण सुरु होणार आहे. कोल्हापूर-राजापूर या नव्या मार्गाचे सर्वेक्षणाचाही यात अंतर्भाव असल्याने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडल्याने व्यापार आणि उद्योगवर्गाला फायदा होणार आहे. वारणानगर आणि राधानगरी अशा दोन्ही मार्गाने हा सर्व्हे करण्यात येणार आहे.
 
या मार्गाबरोबरचं २०० कि.मीचा कराड ते बेळगाव व्हाया निपाणी आणि पुणे, लोणावळा अंदाजे ६५ कि.मीचा तिसरा ब्रॉडगेज लाईन यांचाही समावेश असणार आहे.

First Published: Tuesday, January 3, 2012, 16:06


comments powered by Disqus