Last Updated: Thursday, January 5, 2012, 14:10
www.24taas.com, कल्याण 
कल्याणमध्ये घाणीचं साम्राज्य दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. त्यातच भर म्हणजे कल्याण पूर्वेला असणारे गायी म्हशीचे असणारे तबेले यामुळे घाणीच्या साम्राजात वाढ होते आहे. पण त्यावर कोणत्याही प्रकारची उपाययोजना ही महानगरपालिकेकडून केली जात नाही.
कल्याण पूर्वेच्या पॉश वस्तीत असलेले तबेले नागरिकांसाठी डोकेदुखी बनले आहेत. या तबेल्यांमुळं सगळीकडं घाणीचं साम्राज्य पसरलं आहे. यामुळं नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. निवडणुका आल्या, की इथले नगरसेवक हे तबेले शहराबाहेर नेण्याचं आश्वासन देतात. मात्र वर्षानुवर्षं हे तबेले इथंच आहेत.
आतापर्यंत अनेकदा तबेले हलवण्याचं आश्वासन देऊनदेखील याबाबत काहीच कारवाई न झाल्यामुळं नागरिकांमध्ये संतापाचं वातावऱण आहे. कल्याणमधल्या टोलेजंग इमारतीला बिलगून उभे असलेले गाई, म्हशींचे तबेले नागरिकांना घाणीच्या साम्राज्यात दिवस काढायला भाग पाडत आहेत.
First Published: Thursday, January 5, 2012, 14:10