मित्रांनीच केला कॉलेज तरुणाचा खून - Marathi News 24taas.com

मित्रांनीच केला कॉलेज तरुणाचा खून

www.24taas.com, विरार
 
विरारच्या विठूरमाळी भागात राहणाऱ्या हितेश झा या कॉलेज तरूणाचा त्याच्या पाच मित्रांनीच जुन्या भांडणातून बळी घेतला. त्यातल्या चंदन या मित्रानं खुनाची कबुली दिल्यानं या प्रकरणाचा पर्दाफाश झाला. यातले उरलेले चारही आरोपी फरार आहेत.
 
जुना वाद उकरून काढत मित्राला चालत्या ट्रेनमधून फेकल्याची घटना मुंबईत घडली. मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचं नाव  हितेश झा असं आहे. लोकलमधून पडला असावा अशी शक्यता या मुलाच्या पालकांनी व्यक्त केली जात होती. मात्र हितेशचा मित्र चंदन याला कृत्याचा पश्चाताप झाल्यानं हितेशच्या पालकांना काय घडलं ते सांगितलं.
 
हितेश हा पॉकेटमनीसाठी केटरिंगचं काम करायचा. हितेशच्या मित्रांनी त्याला केटरिंगच्या कामाला जायचं असल्याचं सांगितलं. त्याचे मित्र चंदनसह संजय, अजय, हृषीकेश आणि छोटू असे त्याला घेऊन चर्चगेट लोकलमधून निघाले. वाटेत त्यांनी वाद काढून हितेशला मारहाण केली. गंभीर जखमी झाल्यावर मुंबई सेंट्रल स्थानकात त्याला चालत्या गाडीतून फेकून दिलं.
 
किरकोळ कारणासाठी मित्राचाच जीव घेण्याचं हे कृत्य सुन्न करणारं आहे. कॉलेज करून काम करणाऱ्या हितेशला यात जीव गमवावा लागला. किरकोळ कारणावरुन मित्रच हितेशच्या जीवावर उठले.
 
 

First Published: Friday, January 6, 2012, 19:46


comments powered by Disqus