'शोध मराठी मनाचा' संमेलन विरारमध्ये - Marathi News 24taas.com

'शोध मराठी मनाचा' संमेलन विरारमध्ये

www.24taas.com, विरार
 
जागतिक मराठी अकादमीने आयोजित केलेलं 'शोध मराठी मनाचा' हे संमेलन विरारमध्ये भरवण्यात आलं आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी उद्योगपती अरुण फिरोदिया, तर स्वागताध्यक्ष हितेंद्र ठाकूर आहेत.
 
दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात जगभरातील उल्लेखनीय कार्य करणारे मराठी उद्योजक, कलावंत सहभागी होणारेत. जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यानिमित्तानं मान्यवरांच्या मुलाखती घेणार आहेत.
 
यात अमेरिकेतील ब्रृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष आशिष चौघुले, कॅनडाच्या लीना देवधरे, अमेरिकेचे श्रीनिवास देवधरे आपले अनुभव सांगणार आहेत. तर समारोप शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीनं होणार आहे. रामदास फुटाणे उद्धव ठाकरेंची मुलाखत घेणार आहेत.

First Published: Saturday, January 7, 2012, 19:18


comments powered by Disqus