Last Updated: Sunday, January 8, 2012, 14:14
www.24taas.com, मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या उमेदवारांविरोधात उमेदवार उभे करणा-यांना फटकारले. त्यांचा रोख भास्कर जाधव यांच्याकडं होता. नगरपालिका निवडणूकीत चिपळूणमध्ये भास्कर जाधव यांच्या मुलानं पक्षा विरोधात आघाडी उभी केली होती. अजित पवार यांनी भाषणात जाधव यांचं नाव घेतलं नाही. अशा घटनांमुळं पक्षशिस्त मोडते असं त्यांनी स्पष्ट केलं.
पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांची बैठक सुरु झालीय. काही जिल्ह्यांमध्ये पक्षांतर्गत गटबाजी आहे. तिथंल्या जिल्ह्यातल्या नेत्यांची शरद पवार बैठक घेणार आहेत. अमरावती, जळगाव आणि रत्नागिरी या जिल्ह्यातल्या नेत्यांशी ते चर्चा करणार आहेत. झुंडशाहीच्या विरोधात सामना करण्यासाठी कुणी उठला तर सत्ताबदल हे सिंधुदुर्गमध्ये दिसलं असं गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी सांगत नारायण राणेंना टोला लगावला.
First Published: Sunday, January 8, 2012, 14:14