कोकण रेल्वे सुरक्षिततेला प्राधान्यक्रम देणार - Marathi News 24taas.com

कोकण रेल्वे सुरक्षिततेला प्राधान्यक्रम देणार


झी २४ तास वेब टीम, रत्नागिरी
कोकण रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी स्टेशनवर सीसीटीव्ही आणि बॅगा तपासणीसाठी स्कॅनिंग मशीन लावण्यात येणार आहे. कोकण रेल्वेच्या 22 व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं प्रवाशांना ही भेट देण्याचा मानस रेल्वेनं व्यक्त केला आहे.
 
प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यांना सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशानं कोकण रेल्वेनं पुढचं पाऊल उचललयं. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी स्टेशन्सवर सीसीटीव्ही कॅमेरे आणि बॅग स्कॅनिंग मशीन बसवण्यात येणार आहे. तसंच आर.पी.एफ आणि सुरक्षारक्षकांशी फोनद्वारे संपर्क वाढवण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे असं कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक भानू तायल यांनी सांगितलं.
 
तिकिट दरात वाढ न झाल्यानं कोकण रेल्वेच्या उत्पन्नात घट झालीय. उत्पन्न वाढीसाठी कोकण रेल्वे देशात पोर्ट कनेक्टीव्हीटी मिळवून देण्याचाही प्रयत्न करणार असल्याचं अधिका-यांनी स्पष्ट केलं आहे.
 
कोकण रेल्वेची टक्कर रोधक उपकरण यंत्रणा आता बहुतांश रेल्वे मार्गावर बसवण्यात येणार आहे. वर्धापन दिनाच्या निमित्तानं कोकण रेल्वेनं देऊ केलेली ही भेट प्रवाशांना नक्कीच आवडलेल यात शंका नाही.

First Published: Tuesday, October 18, 2011, 15:21


comments powered by Disqus