सोनियांच्या नावे बनावट रेशनकार्ड - Marathi News 24taas.com

सोनियांच्या नावे बनावट रेशनकार्ड


www.24taas.com , ठाणे
 
सोनिया गांधीच्या नावानं बनावट रेशनकार्ड काढल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरमध्ये  उघडकीस आलाय. सोनिया गांधीच्या नावानं हे कार्ड दिले कसे असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
 
 
आरटीआय कार्यकर्ता आणि उल्हासनगर बचाव अभियानाचे अध्यक्ष प्रेमचंद झा यांनी हे रेशनकार्ड महापालिका मुख्यालय परिसरात सापडलयं. बनावट  रेशनकार्ड सापडल्याने गोंधळ निर्माण झाला. मात्र,  रेशनकार्ड बनावट असल्याचे नोंदीवरून स्पष्ट झाले. झा यांनी याबाबत  गांर्भीय दाखवत त्याची अधिक माहिती घेतली. हे   रेशनकार्ड बनविण्यासाठी  पुरवठा विभागाचा हात असल्याचे दिसून आले. हा प्रकार काहीतरी 'चिरीमिरी' घेऊन झाल्याचे यानिमित्ताने  पुढे आले आहे.
 
 

या रेशनकार्डावर सोनिया गांधी यांच्याबरोबर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या नावाचा उल्लेखही आहे. सोनियांचे ६२, प्रियांका ४२ तर राहुल ४० यांच्या वयाची नोंद करण्यात आली आहे. या रेशनकार्डावर सोनिया गांधी यांचा दिल्लीतला १० पुरवठा निरीक्षकानेही हे कार्ड मंजूर केलयं.
 
 
या रेशनकार्डचा अनुक्रमांक ०३३३८४ आहे. ठाणे शिधापत्रिका कार्यालय नंबर`४१एफ` इथून या रेशनकार्डची नोंदणी झालीये. या बोगस रेशनकार्डच्या निमित्तानं पुरवठा विभागातील भोंगळ कारभार समोर आलाय.
 
 

 

First Published: Wednesday, January 11, 2012, 13:09


comments powered by Disqus