'कॅट’मध्ये मराठी पाऊल पुढे - Marathi News 24taas.com

'कॅट’मध्ये मराठी पाऊल पुढे

www.24taas.com,  मुंबई
 
असोसिएशन ऑफ ऑल इंडिया मॅनेजमेंट (एआयएमएस) यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या कॉमन ऍडमिशन टेस्ट (कॅट) परीक्षेत मराठी झेंडा फडकावून मुंबईचा ठसा दिसून आला आहे.
 
देशातील अग्रगण्य २५ मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमधील तीन हजार जागांच्या प्रवेशासाठी   ‘कॅट’ ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत मराठी तरूणांनी बाजी मारली आहे. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील शशांक प्रभू आणि अंबरनाथ येथील अजिंक्य देशमुख या दोन मराठी विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवून मुंबई विभागातून प्रथम येण्याची चांगली कामगिरी केली आहे. ही परीक्षा देशातील ३६ शहरांमध्ये ६८ केंद्रांवर पार पडली होती. १ लाख ८५ हजार विद्यार्थ्यांमधून देशात फक्त नऊजणांना १०० टक्के गुण मिळाले. यात ठाणे जिल्ह्यातील दोन मराठी तरूणांनी बाजी मारल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
 
श्रेय आईलाच - शशांक प्रभू
माझे माझी आई माझ्या मागे ठामपणे उभी राहिली. तिने माझे अभ्यासाचे व्यवस्थित टाईम टेबल आखून माझ्याकडून अभ्यास करून घेतला. आज ‘कॅट’च्या परीक्षेत मला जे यश मिळाले त्याचे सर्व श्रेय माझ्या आईलाच जाते, अशी प्रतिक्रीया डोंबिवली येथील शशांक प्रभू याने दिली.
 
आर्मस्ट्रॉंग रोल मॉडेल - अजिंक्य देशमुख
कॅन्सरसारख्या असाध्य व्याधीवर मात करून ‘टूर दी फ्रान्स’ या विश्‍वविश्‍वात सायकल शर्यतीत सलग ७ विजेते पद मिळविणारा लार्न्स आर्मस्ट्रॉंग हा माझा रोल मॉडेल आहे. मी तर धडधाकट होतो. मग मी का हार मानू, अशी प्रतिक्रीया अंबरनाथचा अजिंक्य देशमुख याने दिली.

First Published: Thursday, January 12, 2012, 11:43


comments powered by Disqus