मैत्रीखातर चोरलं बाळ - Marathi News 24taas.com

मैत्रीखातर चोरलं बाळ

www.24taas.com, ठाणे
 
मुंबईत मैत्रीखातर चोरीची घटना उघडकीस आली. ही चोरी होती एका लहानग्या बाळाची.
 
अमर शर्मा नावाच्या व्यक्तीनं वाडीबंदर इथं राहणारा आपला मित्र अब्दुल्ला शेख याच्यासाठी एका लहान बाळाची चोरी केली. अब्दुल्लाला लग्नाच्या २५ वर्षांनंतरही मूल होत नसल्यानं तो दु:खी असल्याची गोष्ट त्याचा जिवलग मित्र अमर शर्माच्या लक्षात येताच त्यानं त्याच्याच भागात राहणाऱ्या एका महिलेच्या २ महिन्याच्या बाळाला चोरण्याचा कट रचला. त्यासाठी अब्दुल्लानं त्याला १४ हजार रुपयेही देऊ केले.
 
बाळाची चोरी झाल्याची तक्रार बाळाच्या आईनं पोलिस ठाण्यात केली असता पोलिसांचा शोध सुरू झाला आणि चौकशीत अमर शर्मा त्यांच्या हाती लागला. अमर शर्माच्या जबानी नंतर पोलिसांनी अमर शर्मा आणि त्याचा मित्र अब्दुल्ला या दोघांनाही  अटक केली आहे.

First Published: Tuesday, January 17, 2012, 10:49


comments powered by Disqus