Last Updated: Sunday, January 22, 2012, 09:55
चंद्रशेखर भुयार,www.24taas.com, ठाणे उल्हासनगरमधल्या म्हारळ गावातल्या मजुरी करणाऱ्या कुटुंबानं अपघातात मरण पावलेल्या मुलाचं देहदान केल्यामुळं तीन जणांना जीवदान मिळालं आहे. एका वेठबिगारी करणाऱ्या कुटुंबानं केलेलं हे काम समाजापुढं नवा आदर्श उभा कऱणारं आहे.
उल्हासनगरजवळच्या म्हारळ गावात भाड्याच्या घरात काटकर कुटुंबीय राहतात. या कुटुंबात़ला शैलेश हा १३ जानेवारीला वडील आणि भावासोबत एका घराच्या डागडुजीचं काम करत होता. यावेळी पहिल्या मजल्यावरून तोल जाऊन शैलेश खाली पडला. जखमी शैलेशला वाचवण्याचा कुटुंबियांनी प्रयत्न केला, मात्र उपचारादरम्यान केईएम हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काटकर कुटुंबियांकडं देहदानाचा प्रस्ताव ठेवला आणि फारशा न शिकलेल्या कुटुंबियांनी तो मान्य केल्यामुळं दोन किडनीच्या आणि एका यकृताच्या रुग्णाचा प्राण वाचला.
समाजात अनेक अपप्रवृत्ती तोंड वर काढत असताना काटकर कुटुंबानं दाखवलेला हा मनाचा मोठेपणा दुर्मिळच म्हणावा लागेल. मात्र आपल्या मुलाच्या लग्नासाठी घर विकावं लागलेल्या काटकर कुटुंबियांना आता काळजी आहे ती शैलेशच्या नऊ महिन्यांच्या मुलीच्या भवितव्याची...
First Published: Sunday, January 22, 2012, 09:55