ऐका गाडीची कथा, काय सांगावी नीतांची व्यथा - Marathi News 24taas.com

ऐका गाडीची कथा, काय सांगावी नीतांची व्यथा

www.24taas.com, माथेरान
 
उद्योगपती मुकेश अंबांनी यांची पत्नी नीता अंबानी यांनी माथेरानमध्ये पर्यावरण नियमांचं उल्लंघन केल्याचा प्रकार समोर आला आहे. पर्यावरणाच्या दृष्टीनं संवेदनशील क्षेत्र असलेल्या माथेरान परिसरात कोणतंही वाहन नेण्यास बंदी असताना होंडा CRV गाडी नेल्याप्रकरणी गाडीचा चालक सुधीर शिंदेला अटक करण्यात आली आहे.
 
रविवारी नीता अंबानी माथेरानमधील रग्बी हॉटेलमध्ये आपल्या परिवारासह आल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयानं माथेरान अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केल्यानं माथेरानमध्ये वाहनांना परवानगी नाही. त्यामुळे पर्यटकांना दस्तुरी नाक्यावरच वाहन ठेवून माथेरानमध्ये प्रवेश करावा लागतो.
 
असं असतांनाही नीता अंबानी यांनी नियम धाब्यावर बसवून गाडी माथेरानमध्ये नेल्यानं आश्चर्य व्यक्त होतं आहे. विशेष म्हणजे ही गाडी अँम्ब्युलन्स असल्याचं भासवण्यात आलं होतं. दरम्यान ही गाडी नीता अंबानी यांचीच होती का याची माहिती आरटीओकडून घेतल्यानंतरच कळेल असं पोलिसांनी सांगितल आहे.
 
 

First Published: Monday, January 23, 2012, 20:29


comments powered by Disqus