नवी मुंबईत हुंडाबळी - Marathi News 24taas.com

नवी मुंबईत हुंडाबळी

www.24taas.com, ऐरोली
 
हुंड्यासाठी सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना नवी मुंबईतल्या ऐरोलीत घडली आहे. पूनम कौर असं या महिलेचं नाव आहे.
 
दिवा गावात गणेश कृपा बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या पूनमचे तीन वर्षापूर्वी सुखविंदर सिंग याच्याशी लग्न झालं होतं. लग्नाच्या वेळी पूनमच्या वडिलांनी फ्लॅटसुद्धा दिला होता. मात्र हा फ्लॅट विकून पैसे गडप केले. त्यानंतरही सुखविंदरने पूनमकडे माहेरच्या मंडळींकडून आणखी पैसे आणण्याचा तगादा लावला होता.
 
त्याच्या आणि सासरच्या इतर मंडळींकडून वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून तिने १९ जानेवारीला गळफास लावून आत्महत्या केल्याची तक्रार पूनमच्या माहेरच्या लोकांनी पोलीसांत केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा दाखल करत पूनमचा पती सुखविंदर याला अटक केली आहे.

 

First Published: Thursday, January 26, 2012, 21:24


comments powered by Disqus