'येवा कोकण आपलाच आसा' - Marathi News 24taas.com

'येवा कोकण आपलाच आसा'

झी २४ तास वेब टीम, रत्नागिरी
 
सुट्टी म्हटंल की आठवतं ते आऊटींग. यंदा दिवाळी आणि वीकेंन्ड हा जोडून आल्याने अनेक चाकरमान्यांनी कोकणाकडे आपली पावले वळली आहेत.
 

दिवाळ सणाला जोडूनच वीकेंन्ड आल्यामुळं पर्यटकांची चांगलीच चंगळ झालीए. सुट्यांचा आनंद लुटण्यासाठी लाखो लोकांनी कोकणाकडे धाव घेतली आहे. पर्यटकांना समुद्रकिनारी डान्स पार्ट्यांसह कोकणी पदार्थांची लज्जतही चाखायला मिळते.
 
कोकणातले समुद्रकिनारे पर्यटकांनी हे फुलून गेलेत. दिवाळीच्या सार्वजनिक सुट्ट्या आणि त्याला शनिवार रविवार जोडून आल्यामुळे अनेक पर्यटकांनी कोकणात आपली  सुट्टी घालविण्याचा विचार केला. यामुळं कोकणातील मुरुड, गणपतीपुळे, रत्नागिरी, केळशी, आंजर्ले, तारकर्लीचे बीच पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाले आहेत. त्यातही गणपतीपुळेला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षणीय़ आहे. कोकणातील एमटीडीसीची सर्व हॉटेल्स फुल्ल झाली आहेत.
 

डीजेच्या तालावर बीच पार्ट्या चागंल्याच रंगू लागल्या आहेत. हॉटेल व्यावसायिकांनी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी खास कोकणी पद्धतीच्या जेवणाची मेजवानीही देत आहेत. यंदाचा दीपोत्सव अर्थातच पर्यटकांसह कोकणातल्या व्यावसायिकांसाठी पर्वणीच ठरत आहे. म्हणूनच कोकणवासीय 'येवा कोकण आपलाच आसा' अशी साद घालत आहेत..
 

First Published: Saturday, October 29, 2011, 06:22


comments powered by Disqus