Last Updated: Thursday, February 2, 2012, 12:33
www.24taas.com, ठाणे 
पुरुषांचे जबरदस्तीने युवतींशी लग्न लावल्यानंतर पुन्हा त्याच युवतींचे दुसऱ्याशी लग्न लावून देणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ठाणे पोलिसांनी केला आहे. विशेष म्हणजे दोन महिला हे रॅकेट चालवत होत्या. या महिला लाजेनं आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत होत्या. निर्मला बाविस्कर आणि काजल बाविस्कर नावाच्या या मायलेकींनी ठाण्यात एक सेक्स रॅकेट चालवलं होतं. परराज्यातल्या लग्न न होणाऱ्या पुरुषांचा त्या आधी शोध घेत.
त्यानंतर आपल्याकडे असणाऱ्या गरीब आणि गरजू युवतींचे ते या पुरुषांशी लग्न लावून देत. मात्र काही दिवसांनंतर त्या पुरुषांकडे त्रास होत असल्याचा बनाव करत या मायलेकी या युवतींचे दुसऱ्या पुरुषांशी लग्न लावून देत. अशापद्धतीने अनेक युवतींचे लैंगिक शोषण होत असल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर PITA अंतर्गत या दोघींना अटक करण्यात आली आहे.
पैशाची चणचण आणि लग्न न होणाऱ्या परराज्यातल्या पुरुषांचा वापर करुन घेत ठाण्यातल्या बाविस्कर मायलेकींनी सेक्स रॅकेटचा धंदा चालवला होता. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. यामागे कोणती टोळी स्रकीय आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.
First Published: Thursday, February 2, 2012, 12:33