लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार, एक अटकेत - Marathi News 24taas.com

लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार, एक अटकेत

www.24taas.comनवी मुंबई
 
लग्नाचं आमिष दाखवून २५ वर्षीय युवतीवर वर्षभर बलात्कार करणा-या व्हिडीओकॉन कंपनीच्या उच्चपदस्थ कर्मचा-याला कल्याणमध्ये अटक करण्यात आलीय. सुधीर बनसोडे असं या कर्मचा-याचं नाव आहे.
 
कल्याणच्या कोळसेवाडी परिसरात राहणा-या या युवतीची तिच्या मैत्रिणीने सुधीरशी ओळख करुन दिली. दरम्यानच्या काळात पीडित युवतीची आई आजारी असताना सुधीरने तिला दहा हजार रुपयांची मदत केली. त्यानंतर सुधीरने या युवतीला लग्नाचं आमीष दाखवत वारंवार मुंबईतल्या व्हिडीओकॉनच्या वेगवेगळ्या गेस्टहाऊसमध्ये नेऊन बलात्कार केला.
 
गेले वर्षभर हा प्रकार सुरु होता. अखेर या युवतीने सुधीरकडे लग्नाचा तगादा लावला. मात्र ती पिच्छा सोडत नसल्याचे पाहून सुधीर त्याच्या कल्याणमधल्या राहत्या घरातून फरार झाला. याबाबत युवतीने कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. अखेर गुन्हा दाखल करत पोलीसांनी सुधीरला नवीमुंबईतून अटक केलीय.

First Published: Friday, February 3, 2012, 12:20


comments powered by Disqus