मानखुर्दमध्ये भंगाराच्या गोडाऊनला मोठी आग - Marathi News 24taas.com

मानखुर्दमध्ये भंगाराच्या गोडाऊनला मोठी आग

www.24taas.com, मानखुर्द
 
नवी मुंबईतल्या मानखुर्दमध्ये एका भंगाराच्या गोडाऊनला मोठी आग लागली आहे. अग्निशामक दलाच्या आठ बंबांनी ती अटोक्यात आणली. या गोडाऊनमध्ये प्लास्टिक, लाकूड आणि कचऱ्याच्या वस्तू आहेत.
 
मानखुर्दच्या न्यू मंडाळा रोडवर असलेल्या गोडाऊनला ही आग लागली होती. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. या आगीच्या ज्वाळांनी काही मिनिटांतच उग्र स्वरुप धारण केल्यामुळं ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला अथक प्रयत्न करावे लागत आहेत.
 
या आगीत जिवीतहानीचं कुठलंही वृत्त अद्याप नाही. मात्र मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांना अथक प्रयत्न करावे लागत आहे. आगीचं स्वरूप मोठं असल्याने त्यात मोठ्या प्रमाणात वित्त हानी झालेली आहे.
 

 
 
 
 

First Published: Tuesday, February 7, 2012, 23:25


comments powered by Disqus