पालघरजवळ ट्रक अपघातात ५ ठार - Marathi News 24taas.com

पालघरजवळ ट्रक अपघातात ५ ठार

www.24taas.com, पालघर
 
मुंबई-अहमदाबाद हायवेवर पालघरजवळ वांद्री नदीच्या पुलावरून ट्रक कोसळल्यानं पाच जण जागीच ठार झाले आहेत. मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. या अपघातात 14 जण जखमी असून त्यापैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. या ट्रकमधून प्रवास करणारा एक जण बेपत्ता आहे.
 
विरारहुन हळदीचा कार्यक्रम आटोपून हा ट्रक पालघरकडे परतत असताना हा अपघात पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान झाला. अपघातग्रस्त बोट गावचे रहिवाशी आहेत.
 
 
मृतांची नावे: १) जानकी सुदाम भोईर वय वर्षे-३
२) अंकिता भोईर, वय वर्षे-४
३) अतुल अनंता भोईर, वय वर्षे-६
४) हर्षला मनोहर भोईर, वय वर्षे- १७
५) सुधा सुदाम भोईर, वय वर्षे- ३५
दयानंद दत्तु भोईर हा प्रवासी बेपत्ता आहे. अपघातग्रस्त ट्रकचा क्रमांक- MH-04-DD-5821. या ट्रकमध्ये एकूण २८ प्रवासी होते.
 
 
 

First Published: Wednesday, February 8, 2012, 10:39


comments powered by Disqus