Last Updated: Saturday, February 11, 2012, 21:25
www.24taas.com, रायगड पेण अर्बन बँक बंद पडून दीड वर्ष पूर्ण होत असताना रिझर्व्ह बँके कडून बँक दिवाळखोरीत का काढण्यात येऊ नये, अशी विचारणा प्रशासनाकडे केली होती. मात्र, आता ७५२ कोटींच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी बँकेचा परवानाच ( लायसेन्स) रद्द केला आहे.

मुख्यमंत्री, पालकमंत्री यांनी आश्वासाने देऊनही बँक सुरु होण्यासाठीच्या काहीच हालचाली दिसत नसल्याने ठेवीदार हतबल झाले होते. बँक प्रशासन याबद्दल काहीही बोलण्यास नकार देत आहेत. त्यामुळे ठेवीदारांचे रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाकडे लक्ष लागून राहिले होते. आता तर पेण अर्बन बँकेचे लायसेन्स रिझर्व्ह बँके कडून रद्द करण्यात आल्याने ठेवीदारांचे धाबेच दणाणले आहेत.
पेण अर्बन बँक लिक्विडेशनमध्ये जाण्याची शक्यता असल्याचे पत्र भारतीय रिझर्व्ह बँकेने पेण अर्बनच्या प्रशासनाला पाठविले होते. त्यानंतर ही माहिती ठेवीदारांना कळताच त्यांनी बँकेसमोर जमायला प्रारंभ केला होता. बँकेसमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ठेवीदार जमा झाले. तर संतप्त ठेवीदारांनी बँके विरोधात नारेबाजी करत रास्ता-रोको आंदोलन केले होते. याचा काही उपयोग झाला नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
First Published: Saturday, February 11, 2012, 21:25