बकरी ईदचा बकरा 3 लाखाच्या घरात - Marathi News 24taas.com

बकरी ईदचा बकरा 3 लाखाच्या घरात

झी २४ तास वेब टीम, ठाणे 
 

बकरी ईदच्य़ा माध्यमातून आता समाजकार्याला हातभार लागणार आहे.  ठाण्याच्या बकरी बाजारात अंगावर चंद्राची कोर असलेल्या बक-यावर दोन लाख बावीस हजारांची बोली लागली आहे. या बकऱ्याच्या विक्रीतून येणारा पैसा एका रुग्णाच्या उपचारासाठी खर्च करण्यात येणार आहे. बकरी ईदपर्यंत या बकऱ्यांची किंमत वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
 
ठाण्याच्या आयुब खानकडे असलेला बकरा दिसायला सर्वसाधारण असला तरी त्या बकऱ्याच्या अंगावर असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण चिन्हांमुळं खास झाला आहे. अंगावर चंद्रकोर असलेल्या बकऱ्यावर दोन लाख बाविस हजार सातशे शहाऐंशी रुपयांची बोली लावण्यात आली. बकरी ईदच्या तोंडावर या बकऱ्याला चांगली किंमत येईल असा विश्वास आयुबला आहे. या बक-याच्या विक्रीतून येणारा पैसा आयुब किडनीचा आजार असलेल्य़ा मुलाच्या उपचारासाठी वापरणार आहे.
 
दिवाळीची धामधूम संपत नाही तोच, बकरी ईदची लगबग पहायला मिळत आहे. बकऱ्यांची खरेदी करण्यासाठी अनेक ठिकाणी नुसती झुंबड पहायला मिळते. ठाण्यातील मुंब्रा इथे तर एका बकरीच्या विक्रीतून अफजल खान या मुलावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. या बकरी ईदच्या निमित्ताने सामाजिक उपक्रम राबविला जाणार असल्यामुळे या बकरीची किंमतही लाखांत ठेवण्यात आली आहे. अफजल खान या मुलाच्या दोन्ही किंडन्या चुकीच्या औषधांमुळे निकामी झाल्या. आणि त्याच्या शस्त्रक्रियेसाठी तब्बल पाच ते सहा लाख रूपये खर्च होणार आहेत. या बकरीच्या विक्रीमधूनच अफजलवर शस्त्रक्रीया केली जाणार आहे. मात्र, बकरी ईदपर्यंत या बकरीची किंमत पाच-सहा लाखांपर्यंत जाणार असल्याचा दावा बकरी विक्रेता अयुब खानने केला आहे.

First Published: Saturday, November 5, 2011, 13:26


comments powered by Disqus