अंबरनाथमधले सफाई कामगार संपावर - Marathi News 24taas.com

अंबरनाथमधले सफाई कामगार संपावर


www.24taas.com, अंबरनाथ
 
अंबरनाथ नगर पालिकेचे एक ते दीड हजार सफाई कर्मचारी सोमवार मध्यरात्रीपासून अचानक संपावर गेले आहेत.
 
अंबरनाथ शहरात महाशिवरात्रीची मोठी जत्रा असते. त्यामुळे लाखो भक्त इथं असलेल्या प्राचीन शिव मंदिरात दर्शनासाठी येतात. जत्रेदरम्यान शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचा ढिग जमा झाला आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.
 
कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी मिळावी आणि त्यांची अनुकंप तत्वावर भरती प्रक्रिया व्हावी या मागण्यांसाठी हा संप करण्यात येत आहे. या संपामुळे नागरीकांमध्ये मात्र प्रचंड संताप निर्माण झाला आहे.

First Published: Tuesday, February 21, 2012, 23:39


comments powered by Disqus