सिंधुदुर्गात राणेंविरोधात दंड थोपटले - Marathi News 24taas.com

सिंधुदुर्गात राणेंविरोधात दंड थोपटले

झी २४ तास वेब टीम, सिंधुदुर्ग
 
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे समर्थक आणि जुन्या काँग्रेसमधील वाद पुन्हा उफाळून आलाय.
 
नारायण राणेंच्या कार्यपध्दतीविरोधात आमदार विजय सावंत यांनी जुन्या कार्यकर्त्यांची मोट बांधून मेळावा घेतला. यावेळी जुन्या काँग्रेसमधील कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा पाढा वाचला. अलिकडं विजय सावंत राणेंविरोधात आक्रमक झालेत.
 
दरम्यान, पक्षात माझ्याविरोधात षडयंत्र रचण्यात येत असल्याचा आरोप राणे यांनी केला आहे. राणेंनी तशी स्पष्ट नाराजी व्यक्त केली. तसचं रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड येथे राणे पिता-पुत्रांनी काँग्रेसचा मित्रपक्ष राष्ट्रवादीवरही टीका केली होती. यावेळी कार्यकर्त्यांना कानपिचक्याही दिल्या.

First Published: Monday, November 7, 2011, 07:13


comments powered by Disqus