Last Updated: Tuesday, February 28, 2012, 14:15
www.24taas.com, नवी मुंबई उपकर चुकवल्याप्रकरणी नवीमुंबई महापालिकेने मद्य दुकानावर सील ठोकण्याची कारवाई केली आहे. वाशी मधल्या सोनी वाईन्स या दुकानानं महापालिकेचा जवळपास तेहतीस लाख रुपयांचा उपकर थकवला होता.
या प्रकरणी दुकानाची बँक खाती सील केल्यानंतरही उपकर भरला नाही. त्यामुळे या दुकानावर धाड टाकून सील ठोकण्याची कारवाई महापालिकेने केली. या कारवाईत उपकर विभागाने १५ लाखांचा मुद्देमाल सील केला.
शिवाय दुकानातल्या हिशेबाच्या वह्या जप्त केल्या आहेत. उपकर थकवणाऱ्या मद्यविक्री दुकानावर पालिकेने प्रथमच कारवाई केलीय.
First Published: Tuesday, February 28, 2012, 14:15