मुजोर रिक्षाचालकांचा संप कायम - Marathi News 24taas.com

मुजोर रिक्षाचालकांचा संप कायम

www.24taas.com, मीरारोड
 
मीरारोडमध्ये मुजोर रिक्षाचालकांनी सलग चौथ्या दिवशीही बंद पुकारला आहे.आरटीओनं रिक्षा प्रवासी वाहतूकीचं नविन दरपत्रक जारी केलं होतं. मात्र हे दरपत्रक मान्य नसल्यानं कोणतीही पूर्वसुचना न देता रिक्षाचालकांनी बंद पुकारला. या बंदमध्ये फक्त मीरारोडमधील रिक्षा चालक सहभागी झाले आहेत. बंदमुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.
 
तसंच आरटीओनं दर वाढवल्यानंतर रिक्षा चालकांना विश्वासात न घेता महापालिकेच्या माध्यमातून परिसरात सर्वत्र रिक्षांचे विविध मार्गांचे दरपत्रक लावल्यानं रिक्षा चालक आणखीनच संतापले आहेत. या बंदमध्ये ५००ते ७०० रिक्षाचालक सहभागी आहेत.
 
दरम्यान, एकिकडे रिक्षा चालकांची मुजोरी तर दुसरीकडे  रिक्षा भाडेवाढीसाठी शरद राव आक्रमक झाले आहेत. भाडेवाढ न दिल्यास १६ एप्रिलपासून बेमुदत संपाचा इशारा शरद राव यांनी दिलाय. किमान १६ ते २०रुपये भाडेवाढीची मागणी शरद राव यांनी केली आहे. मीटर सक्ती नको, मात्र भाडेवाढ हवी, अशी आडमुठी भूमिका आता संघटना घेऊ लागल्या आहेत. याचवेळी मंत्रालयात होणारी बैठक रद्द झाल्याने रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढीचा आज होणारा निर्णय लांबणीवर पडला आहे.

First Published: Saturday, March 3, 2012, 18:17


comments powered by Disqus