Last Updated: Saturday, March 3, 2012, 20:36
www.24taas.com, ठाणे नालासोपाऱ्यातल्या संतोष भुवन परिसरातील एका ढाब्यात बुधवारी अमली पदार्थांची विक्री करण्यास आलेल्या दोन जणांना नालासोपारा पोलिसांनी सापळा रचून अटक केली.
ढाब्याजवळ काही लोक गांजा घेऊन येणार असल्य़ाचं खात्रीदायक वृत्त पोलिसांना मिळालं होतं. अटक केलेल्य़ा दोघांकडून १५ किलो गांजा हस्तगत कऱण्यात आला आहे. मन्ना लाल आणि प्रदीप नंदकिशोर अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावं आहेत.
प्रदीपकडून आठ किलो तर मन्ना कडून सात किलो गांजा जप्त कऱण्यात आला आहे. या दोन्ही आरोपींविरोधात नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आलाय.
First Published: Saturday, March 3, 2012, 20:36