युतीचे ८० टक्के नगरसेवक संपर्कात- आव्हाड - Marathi News 24taas.com

युतीचे ८० टक्के नगरसेवक संपर्कात- आव्हाड

www.24taas.com, ठाणे
 
राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. भाजप नगरसेविका सुहासिनी लोखंडे आणि त्यांच्या कुटुंबियांना आव्हांडांच्या इशाऱ्यानुसार त्यांच्या गुंडांनी अपहरण केल्याचा आरोप शिंदे यांनी केला होता.
 
दरम्यान जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात भाजप नगरसेविका सुहासिनी लोखंडेंच्या अपहरण केल्याप्रकरणी नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आव्हाडांच्या इशाऱ्यावरुन त्यांच्याच गुंडांनी सुहासिनी लोखंडे आणि त्यांच्या कुटुंबियांचे अपहरण करण्यात आल्याचं आरोप ठाणे सेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी केला.
 
आपण कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयार असल्याचं आव्हांडांनी सांगितलं. तसंच शिवसेना-भाजप युतीचे ऐंशी टक्के नगरसेवक आपल्या संपर्क असल्याचं तसंच पुराव्यानिशी सिध्द करुन देईन असा गौप्यस्फोट आव्हांडांनी केला आहे.
 
बेपत्ता भाजप नगरसेविका सुहासिनी लोखंडे यांना घातपात झाल्याचा संशय ठाणे शिवसेना जिल्हा प्रमुख एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. सुहासिनी लोखंडेंना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांनी घातपात केल्याचं संशय एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी झी २४ तासशी बोलताना पोलिसांनी तपास जलदगतीने करावा अशी मागणी शिंदे यांनी केली. लोखंडेच्या बाबतीत भाजपची चूक असल्याचं मत शिंदे यांनी व्यक्त करताना भाजपच्या नेत्यांनी काळजी घेणं आवश्यक होतं असंही त्यांनी सांगितलं.
 
ठाण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवायची त्यासाठी त्यांनी खालची पातळी गाठली आहे अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी व्यक्त केली. लोखंडे यांची हत्या केली असावी असाही आमचा संशय असल्याचं संशय शिंदे यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीचे ठाण्यातल्या नेत्यांनी सत्तेचा गैरवापर, दुरुपयोग करत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीच सुहासिनी लोखंडे आणि त्यांच्या कुटुंबियांना गायब केल्याचा आरोपच शिंदे यांनी केला आहे. तसंच यानंतर पुकारलेलं आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल आणि त्यांची जबाबदारी पोलीस आणि सरकारवर असेल असा इशाराही शिंदे यांनी दिला.
 
 

First Published: Sunday, March 4, 2012, 14:16


comments powered by Disqus